Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताला जी २० परिषदेचे यजमान पद नाही

भारताला जी २० परिषदेचे यजमान पद नाही

भारतात 2019 साली होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूक आणि मेगा सेंटरचा अभाव यामुळे 2019 च्या 20 परिषदेचे यजमान पद भारताला रद्द करावे लागले आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे या परिषदेचे आयोजन 2018 साली करण्याचे ठरवले होते. मात्र आर्जेन्टिना आपल्याकडील ही संधी सोडण्यास तयार नव्हता.

जपानला 2019 च्या या परिषदेच्या यजमानपदाची संधी मिळणार आहे. आता  सरकारने आणखी काही वर्षे या संधीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. 20 परिषदेच्या यजमानपदाच्या आशियाई देशांच्या फेरीपर्यंत भारताकडे या यजमानपदाची संधी मिळणार नाही.आता यासाठी 2021-2022 मध्ये भारताला हि संधी मिळू शकते, मात्र त्यासाठी इंडोनेशियाशी स्पर्धा करावी लागेल. 20 परिषदेचा उद्देश भारतात बाह्य देशांच्या प्रतिनिधींना आकर्षित करण्याबरोबरच जागतिक पातळीवरचा रोजगार उपलब्ध करून देणे हा होता.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे : रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल