Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पतंग उडवता उडवता उडवणारा माणूसच जर हवेत उडून गेला तर ? काय

पतंग उडवता उडवता उडवणारा माणूसच जर हवेत उडून गेला तर ? काय
, बुधवार, 22 डिसेंबर 2021 (17:45 IST)
जर पतंग उडवता उडवता उडवणारा माणूसच जर हवेत उडून गेला तर ? काय, आश्चर्य वाटलं ना? ही कोणतीही कल्पना नाही तर प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. पतंग उडवत असताना अचानक एक व्यक्ती पतंगासोबतच आकाशात उडून गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ श्रीलंकेमधल्या जाफनामधला आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, नुकतीच श्रीलंकेतल्या जाफनामध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ही घटना घडली आहे. हा व्यक्ती त्याच्या टीमच्या मदतीने दोरी पकडून एक मोठा पतंग हवेत उडवण्याचा प्रयत्न करत होता. पतंग तर हवेत उडाला पण या पतंगासोबत तो व्यक्तीसुद्धा हवेत उडू लागला. बघता बघता हा व्यक्ती उंच आकाशात जवळजवळ ३० फूट उंचावर गेला. त्याचे साथीदार आणि आजुबाजूला जे नागरिक होते त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.  
 
 खरं तर पतंग इतका जड होता की त्याबरोबर व्यक्ती सुद्धा पतंगाबरोबर हवेत उडू लागला आणि तो वर आकाशात ३० फूट उंचावर दोरीला धरून लटकत राहिला. यानंतर त्याचे साथीदार दोरी सोडा नाहीतर पतंग आणखी उंचावर जाईल, असं जोरजोराने ओरडताना दिसून येत आहेत. अखेर पतंग थोडा खाली येताच हा व्यक्ती खाली येण्यासाठी प्रयत्न करत होता. पण वारा इतका जोरात वाहू लागला होता की पतंग लगेच हवेत उडू लागला. अखेर मग या व्यक्तीने ३० फूट उंचीवरून उडी घेतली आणि तो जमिनीवर कोसळला आणि कसाबसा आपला जीव वाचवला.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asian Champions Trophy Hockey भारताने पाकिस्तानचा 4-3 ने पराभव करत कांस्यपदक पटकावले