‘मी श्रीमंत असून मी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही’, असे विधान सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान त्यांनी केले आहे. सध्या यांच्या श्रीमंतीची चर्चा जगभरात होत आहे. सलमान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी राहणीमानावरील खर्चावर भाष्य केले आहे.
ते म्हणाले, माझी संपत्ती हा माझा खासगी मुद्दा आहे. माझ्या वैयक्तिक खर्चावर बोलायचे झाल्यास मी एक श्रीमंत माणूस आहे. मी गरीब नाही. मी गांधी किंवा मंडेला नाही, असे त्यांनी सांगितले. मी माझ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा सामाजिक कामांसाठी दान करतो. माझ्या उत्पन्नातील ५१ टक्के रक्कम जनतेवर तर ४९ टक्के रक्कम स्वतःसाठी खर्च करतो, असेही त्यांनी सांगितले. सौदी अरेबियात महंमद सलमान यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घराण्यातील काही मंडळींना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात धाडले. या कारवाईचेही त्यांनी समर्थन केले आहे. आम्ही सौदी अरेबियात जे केले, ते अत्यंत महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.