Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंगावर किडे आणि कोळी.फिरत होते, जंगलात आढळले नवजात बाळ

अंगावर किडे आणि कोळी.फिरत होते, जंगलात आढळले नवजात बाळ
, शनिवार, 25 डिसेंबर 2021 (15:17 IST)
देव तारी त्याला कोण मारी ,असे म्हणतात अनेकवेळा अशा काही घटना समोर येतात की हे प्रत्यक्षात येताना दिसते. असेच एक प्रकरण थायलंडमधून समोर आले आहे, जिथे एका भयानक जंगलात एक नवजात मुलगी सापडली होती, जिच्या शरीरावर किडे रेंगाळत  होते आणि ती धोकादायक प्राण्यांसोबत पडली होती, पण  जेव्हा लोकांनी त्या मुलीला उचलले तेव्हा तिचा श्वास चालताना पाहिले.
ही घटना थायलंडच्या क्राबी प्रांतातील आहे. येथील जंगलाजवळील झाडांवरून रबर गोळा करण्यासाठी काही स्थानिक लोक गेले असता त्यांना नवजात मुलगी दिसली. ही मुलगी ज्या भागात पडली होती तिथे कोब्रा, अजगर असे धोकादायक प्राणी आढळून आले . मुलीला पाहताच थरकापच उडाला .
मुलीवर सर्व प्रकारचे किडे फिरत असल्याचेही दिसून आले. इतकंच नाही तर काही लोकांना वाटलं की ही मुलगी मेली असावी, पण तिला जवळून पाहिलं तर तिचा श्वासोच्छ्वास सुरू होता. तत्काळ ही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि मुलीची सुटका करण्यात आली. तातडीने रुग्णवाहिका घेऊन आलेल्या पथकाने मुलीवर उपचार सुरू केले. नवजात मुलीच्या चेहऱ्यावर ओरखडेही उमटले होते. मुलीला उचलताच ती रडू लागली.
ही नवजात मुलगी जवळपास दोन दिवस तेथे पडून असल्याचे सांगण्यात आले. सध्या मुलीला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून तिची प्रकृती ठीक आहे. एका निवेदनात स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या आईचा शोध सुरू आहे. नजीकच्या काळात कोणत्या महिलेने मुलीला जन्म दिला आहे का, याचा तपास देखील जवळच्या हॉस्पिटल मधून घेतला जात आहे.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेकोटीसाठी चक्क दुचाकी पेटवली