Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा १५ महिन्यानंतर नदीत पडलेला 'आयफोन' सापडतो

जेव्हा १५ महिन्यानंतर नदीत पडलेला 'आयफोन' सापडतो
नदीत पडलेला आयफोन १५ महिन्यानंतर सुस्थितीत मिळाला असल्याची घटना दक्षिण कॅरोलिनामधल्या एरिका सोबत घडली आहे. या घटनेत  एरिका कुटुंबासोबत १९ जून, २०१८ दक्षिण कॅरोलिनामधील एडिस्टो नदीजवळ सहलीला गेली होती. सहिलाला पाण्यात खेळत असताना एरिकाचा स्मार्टफोन नदीच्या पाण्यात पडला. १५ महिन्यांनतर मायकल बेनेट नावाचा तरुण याच नदीत स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी गेला होता. यावेळी नदीच्या तळाशी त्याला एरिकाचा फोन सापडला. १५ महिन्यांनंतर फोनवर शेवाळ जमलं होतं. 
 
मायकलने तो फोन घरी आणला आणि सहजच चार्जिंगला लावला. आश्चर्य म्हणजे मायकलने चार्जिंग केल्यानंतर हा फोन सुरु झाला. इतक्या खोल पाण्यात १५ महिने पडून देखील फोन सुस्थितीत होता. फोन चालू झाल्यानंतर मायकलने सिम कार्डद्वारे फोनच्या मालकाचा शोध घेतला. त्यानंतरच त्याचा एरिकाशी संपर्क झाला. एरिकाला जेव्हा तिचा फोन परत मिळाला तेव्हा तिला देखील धक्काच बसला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रस्ते अपघाताचा बळी, नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे निधन