Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इराणचे पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले, पाकिस्तान म्हणतो, ‘गंभीर परिणाम होऊ शकतात’

Missile attack
, बुधवार, 17 जानेवारी 2024 (09:04 IST)
इराणनं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. बलुचिस्तानच्या नैऋत्य भागात हे हल्ले झाले आहेत.
इराणनं मंगळवारी (16 जानेवारी) केलेल्या या हल्ल्यांत दोन मुलं ठार आणि तीन जण जखमी झाली आहेत, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
 
जैश अल-अदल या दहशतवादी गटाशी संबंधित दोन तळांना लक्ष्य केल्याचं इराणनं सांगितल्याचं देशाच्या सैन्याशी संलग्न असलेल्या एका वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
 
तर, या बेकायदेशीर हल्ल्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
 
इराक आणि सीरियावर हल्ले केल्यानंतर काही दिवसांतच इराणच्या हल्ल्याचा फटका बसणारा पाकिस्तान हा तिसरा देश ठरला आहे.
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं कठोर शब्दांत या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
 
पाकिस्ताननं काय म्हटलं?
मंत्रालयानं म्हटलंय की, "इराणनं विनाकारण हवाई हद्दीत केलेल्या उल्लंघनाचा तीव्र निषेध करत आहोत.”
 
"ही घटना संपूर्णपणे अस्वीकार्य असून पाकिस्तान आणि इराणमधील संवादाचे अनेक माध्यम अस्तित्वात असूनही हे बेकायदेशीर कृत्य घडले आहे हे त्याहून अधिक चिंताजनक आहे," असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
 
"दहशतवाद हा सामायिक शत्रू आहे आणि त्यावर एकतर्फी कारवाई चांगल्या शेजारी संबंधांसाठी पूरक नाहीत."
 
पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याकडे निषेध नोंदवला आहे.
 
"पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे हे उघड उल्लंघन आणि याच्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे इराणवर असेल," असं म्हटलं आहे.
 
इराणनं आपल्या शेजारी पाकिस्तानवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला अभूतपूर्व आहे. मंगळवारच्या हल्ल्यानं दोन देशांच्या सीमेवर असलेल्या बलुचिस्तानच्या दक्षिण-पश्चिम प्रांतातील एका गावाला फटका बसला.
 
दोन्ही देशांची सामायिक सीमा जवळपास 900 किमी आहे आणि या सीमेची सुरक्षा ही दोन्ही सरकारांसाठी दीर्घकाळापासून चिंतेची बाब आहे.
 
पाकिस्तान आणि इराणने जैश अल-अदलसह सारख्या सशस्त्र फुटीरतावादी गटांशी अनेक दशकांपासून लढा दिला आहे.
 
तेहराननं गेल्या महिन्यात इराणी सीमेजवळ झालेल्या हल्ल्यांशी या गटाचा संबंध जोडला आहे. या हल्ल्यात डझनभर इराणी पोलीस अधिकारी मारले गेले होते.
 
त्यावेळी इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी म्हणाले होते की, “या हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवादी पाकिस्तानातून इराणमध्ये घुसले होते.”
 
यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या कार्यालयानुसार, “जैश अल-अदल हा सिस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेला सर्वांत सक्रिय आणि प्रभावशाली सुन्नी दहशतवादी गट आहे.”
 
इराणनं मंगळवारी इराकच्या उत्तरेकडील शहर इरबिलमधील लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2018 च्या कार्यकारिणीतला 'तो' व्हीडिओ दाखवला आणि...