Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 9 January 2025
webdunia

Israel : इस्रायलचा सीरियातील दमास्कस मध्ये मोठा हल्ला; अनेकांचा मृत्यू

Israel : इस्रायलचा सीरियातील दमास्कस मध्ये मोठा हल्ला; अनेकांचा  मृत्यू
, बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (10:43 IST)
मध्यपूर्वेतील इस्रायल, लेबनॉन आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष सातत्याने वाढत आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मंगळवारीही जोरदार गोळीबार सुरू होता. इस्त्रायली सुरक्षा दलांनी लेबनॉनमध्ये त्यांच्या जमिनीवरील हल्ल्याचा विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला केला आहे. ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 
 
दमास्कसमधील एका निवासी इमारतीवर इस्रायली सैन्याने हवाई हल्ला केल्याचे सीरियन सरकारी माध्यमांनी सांगितले. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. या भागात सुरू असलेल्या युद्धामुळे हजारो लोकांना इस्रायल-लेबनॉन सीमेवरील घरे सोडून पलायन करावे लागले आहे.
 
याआधी सोमवारी इस्रायलने एका तासाच्या आत दक्षिण लेबनॉनमधील 120 हून अधिक हिजबुल्लाह स्थानांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाचे 50 सैनिक मारले गेल्याची माहिती आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अविवाहित महिलेला गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी न्यायालयाकडून मिळाली परवानगी