Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्रायली सैन्याने गाझामधील रफाह सीमेवर कब्जा केला

israel hamas war
, बुधवार, 8 मे 2024 (19:27 IST)
इस्रायली लष्कराने गाझा सीमेला लागून असलेल्या रफाह शहरावरही संपूर्ण ताबा मिळवला असून, युद्धविरामाच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या असून हमासवर इस्रायली लष्कराचा मोठा विजय आहे. मंगळवारी गाझाची सीमा असलेल्या रफाह वर इस्त्राईल टॅंक बिग्रेड गस्त घालताना दिसत आहे. या मुळे लोकांमध्ये घबरहाट पसरली आहे. इस्रायलने आता दक्षिणेकडील गाझा शहरात प्रवेश केला आहे.
 
इस्रायलसोबत गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी इजिप्त आणि कतारने मांडलेला युद्धविराम प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे अतिरेकी गट हमासने सोमवारी रात्री रफाहवर हा हल्ला केला .
या युद्धाला मंगळवारी सात महिने पूर्ण झाले. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धात 34,700 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे. मंगळवारच्या रफाह ताब्यात घेतल्याने इस्रायलने गाझाच्या सीमेवर पूर्ण नियंत्रण मिळवले.
 
रफाह सीमेवरील गाझा क्षेत्रावर लष्कराचे नियंत्रण हे हमासची लष्करी आणि प्रशासन क्षमता नष्ट करण्याच्या दिशेने एक "महत्त्वाचे पाऊल" आहे.राफाह सीमेवर इस्रायली हल्ल्यांमुळे काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
रफाहमध्ये रात्रभर इस्रायली हल्ले आणि बॉम्बफेकीत कमीतकमी सहा महिला आणि पाच मुलांसह किमान 23 पॅलेस्टिनी ठार झाले,दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासचा नाश करण्याच्या उद्दिष्टासाठी रफाह ताब्यात घेण्यासाठी आक्रमण महत्त्वपूर्ण असल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इस्त्रायलने जाहीर केले की ते राफाह ऑपरेशन वाढवतील. 

Edited By- Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ममता बॅनर्जींचा भाजपवर मोठा आरोप, म्हणाल्या- भाजप पैसे देऊन मते विकत आहे