Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रफाच्या रस्त्यांवर उतरले इस्रायली रणगाडे, शहरात तुफान गोळीबार

Israel Hamas war
, बुधवार, 29 मे 2024 (16:00 IST)
गाझाच्या दक्षिण भागात वसलेल्या रफा शहरामध्ये पॅलेस्टिनी विस्थापितांच्या एका शरणार्थी शिबिरात झालेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले आहेत.
 
मंगळवारी (28 मे रोजी) इस्रायली सैन्यानं रफाच्या अल-अवदा चौकाजवळचा परिसर ताब्यात घेतला. त्यानंतर शहरात तोफा आणि स्फोटांचे आवाज येत आहेत. या स्फोटात 45जण मारले गेले असल्याची माहिती रॉयटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थांनी पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिली आहे. तसंच या हल्ल्यात 64 नागरिक जखमी झाल्याचा हमास प्रशासित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे.
 
या हल्याबाबत अमेरिकेनी वक्तव्य केलं आहे. इस्रायलची रफातील मोहीम हा काही फार मोठा हल्ला नाही असे अमेरिकेनी म्हटले आहे.
 
'वफा' या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार पॅलेस्टिनी प्रशासनाचे प्रवक्ते नाबिल अबू रुदेइनेह यांनी रफामध्ये झालेल्या हल्ल्याचं वर्णन 'नरसंहार' असं केलं आहे. दरम्यान इस्रायली सैन्यानं रफा शहरातील एका महत्त्वाची टेकडी ताब्यात घेतली आहे.
 
व्यूहरचनेच्या दृष्टीकोनातून ही जागा महत्त्वाची मानली जाते. जवळच असलेली इजिप्त-गाझा सीमा इथून व्यवस्थित दिसू शकते.
 
राफामध्ये इस्रायलने काही मोठा हल्ला केलेला नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे स्पष्ट केलं आहे.
किर्बी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, रविवारी जे हवाई हल्ले झाले, त्यात मुख्यत्वे मुलं, महिला आणि वृद्धांचे प्राण गेले. ही भयानक घटना आहे.
ते म्हणाले, कोणाही निरपराध्याचे प्राण जाता कामा नयेत.
 
किर्बी म्हणाले, आम्हाला आताही वाटतंय की राफामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राऊंड ऑपरेशनची गरज आहे आणि आतापर्यंत मोठ्या स्तरावरचं ऑपरेशन अजून पाहिलेलं नाही.
 
अमेरिका या सध्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणावरचा हल्ला मानतं की नाही असं विचारल्यावर ते म्हणाले, “इथं राष्ट्राध्यक्ष कोणत्याही प्रकारे परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करत नाहीयेत किंवा कोणत्याही प्रकारचा शब्दच्छल करत नाहीयेत."
 
इस्रायली सैन्यानं काय म्हटलं?
सोशल मीडियावर येत असलेल्या फुटेजमध्ये या स्फोटानंतरचं घटनास्थळाचं दृश्य दिसतं आहे. या फुटेजचं विश्लेषण केल्यानंतर बीबीसीच्या लक्षात आलं आहे की हे फुटेज आजचंच आहे.
 
मात्र हा स्फोट नेमका कुठे झाला आहे याची खात्री आम्ही देत नाही. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत आणि आम्हाला जसजशी अधिक माहिती मिळेल तसतशी आम्ही ती तुमच्यापर्यत पोहोचवू. हे शरणार्थी शिबीर जवळच्या शस्त्रांस्त्रांच्या साठ्यावर केलेल्या हवाई हल्ल्याच्या परिघात असल्यानं तर इथे स्फोट झाला नाही ना या शक्यतेचा आम्ही तपास करत आहोत, असं इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे.
 
इस्रायली सैन्याचे प्रवक्ते रीअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की आम्ही ज्या दोन बॉम्बचा वापर केला होता, ते आकारानं इतके लहान होते की त्यातून इतका मोठा स्फोट होऊ शकत नाही.
 
त्यांनी असंही म्हटलं की हमासच्या ज्या दोन वरिष्ठ कमांडरना लक्ष्य करण्यासाठी हा हवाई हल्ला झाला, ते दोघे इस्रायलनं मानवतावादी परिसर म्हणून घोषित केलेल्या भागाच्या बाहेर उपस्थित होते. या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद लवकरच एक आपातकालीन बैठक घेणार आहे.
 
गाझाच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे?
गाझाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की इस्रायलनं विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनींच्या शरणार्थी शिबिराला लक्ष्य करूनच हा हल्ला केला आहे. आपतकालीन सेवेनी सांगितलं की अल मवासी मध्ये काही तंबूंवर चार तोफगोळ्यांनी हल्ला करण्यात आला होता.
 
अल मवासी या ठिकाणाला इस्रायलनं पॅलेस्टिनी लोकांसाठी सुरक्षित परिसर म्हणून चिन्हांकित केलं होतं. मंगळवारीच इस्रायलचे रणगाडे रफा शहरात पोचले. स्थानिक लोक आणि पत्रकारांनी सांगितलं की इस्रायली सैन्यानं शहराच्या एका मुख्य चौकावर नियंत्रण मिळवलं आहे. या ठिकाणी बॅंक आणि सरकारी कार्यालयं आहेत.
 
याआधी पहिल्यांदाच इस्रायलचे रणगाडे रफा शहरात पोचले. स्थानिक लोक आणि पत्रकारांनी सांगितलं की इस्रायली सैन्यानं शहराच्या एका मुख्य चौकावर नियंत्रण मिळवलं आहे. या ठिकाणी बॅंक आणि सरकारी कार्यालयं आहेत.
 
रफामध्ये इस्रायलची मोहीम काही मोठा हल्ला नाही
रफामध्ये इस्रायलने काही मोठा हल्ला केलेला नाही असं अमेरिकेचं म्हणणं आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे स्पष्ट केलं आहे.
 
किर्बी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, रविवारी जे हवाई हल्ले झाले, त्यात मुख्यत्वे मुलं, महिला आणि वृद्धांचे प्राण गेले. ही भयानक घटना आहे.
 
ते म्हणाले, कोणाही निरपराध्याचे प्राण जाता कामा नयेत.
 
किर्बी म्हणाले, आम्हाला आताही वाटतंय की राफामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राऊंड ऑपरेशनची गरज आहे आणि आतापर्यंत मोठ्या स्तरावरचं ऑपरेशन अजून पाहिलेलं नाही.
 
अमेरिका या सध्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणावरचा हल्ला मानतं की नाही असं विचारल्यावर ते म्हणाले, “इथं राष्ट्राध्यक्ष कोणत्याही प्रकारे परिभाषा बदलण्याचा प्रयत्न करत नाहीयेत किंवा कोणत्याही प्रकारचा शब्दच्छल करत नाहीयेत."

Published By- Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वे अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाने, मेडिकल कॉलेजच्या छतावरून घेतली उडी