Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्रायलचा इराणवर हल्ला!

iran attack israel
, शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (11:15 IST)
इराणने इस्रायलवर आधीदेखील क्षेपणास्त्राने हल्ला केला होता. तसेच इराणच्या दूतावासावर सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये 1 एप्रिलला हल्ला झाला होता. वरिष्ठ जनरलसह एकूण 13 जणांचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झाला होता. व इराणने इस्रायलला या हल्ल्याकरिता दोषी ठरवले होते. या हल्ल्याची जवाबदारी इस्रायलने स्वीकारण्यास नकार दिला. अनेक ड्रोन आणि मिसाइल हल्ले  इराणने गेल्या काही दिवसांत  इस्रायलवर केले होते. तसेच इस्रायलकडून मिसाइल हल्ला इराणवर केल्याचे मिळालेल्या माहितीमधून समोर आले आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल युद्धची माहिती समोर येत आहे. आता युद्धजन्य परिस्थिती पश्चिम आशियामध्ये निर्माण होतांना दिसत आहे. अनेक ड्रोन आणि मिसाइल हल्ले इस्रायलवर काही दिवसांत इराणने केले होते. मिसाइल हल्ला आता इस्रायलकडून इराणवर केल्याची माहिती समोर येत आहे. 
इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीला इस्रायली मिसाइलने टार्गेट केले असून, आता इमर्जन्सी सायरन उत्तर इस्रायलच्या अरब अल अरामशेमध्ये वाजवण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संयम राखण्याचं आवाहन मिसाइल आणि इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलच्या सहकारी देशांनी केले होते. कसं उत्तर द्यायचं आणि ते कधी द्यायचे इराणला, असे इस्रायलने स्पष्ट केलं होते. 13 एप्रिलला इस्रायलवर पहिल्यांदा इराणने हल्ला केला होता. 300 पेक्षा जास्त मिसाइल इराणकडून  इस्रायलवर टाकण्यात आले होते. मग या दोन्ही देशांना समजवण्याचा प्रयत्न अनेक देशांनी केला. 
 
Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'समीर वानखेडे विरोधातील तपासाचा तपशील द्या', मुंबई उच्च न्यायालयाने एनसीबीला दिले निर्देश