Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे आहे जगातील सर्वात श्रीमंत गाव

uri village
, रविवार, 5 जून 2022 (12:46 IST)
एकाद्या गावाचं नाव जरी तोंडावर आले तर डोळ्यापुढे गावातील कोलारूचे कच्चे घर, कच्चे रस्ते, शेतात नांगरणी करत असताना शेतकरी विहीर,झाड,असे काही दृश्य समोर येतं. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गावाबद्दल सांगणार आहोत त्या गावाने भारतातील मेट्रो शहरांनाही मागे टाकले आहे. या गावासमोर मोठं शहरही लहान आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात राहणाऱ्या लोकांचा पगार. या गावात राहणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ऐंशी लाख रुपयांहून अधिक आहे.
 
हे गाव जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. हे शेतीप्रधान गाव आहे, म्हणजेच येथील लोक प्रामुख्याने शेतीशी निगडीत आहेत. यानंतरही त्याचं घर, त्याची जीवनशैली पाहून मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांनाही त्यांचा हेवा वाटेल. हे गाव आहे चीनमधील जियांगयिन शहराजवळ असलेल्या हुआझी गाव. या गावात राहणारा प्रत्येकजण शहरांमध्ये राहणाऱ्यांइतकाच श्रीमंत आहे.
 
हुआझी गाव हे एक सामान्य शेतकऱ्याप्रमाणे काम करणारे कृषी गाव आहे. म्हणजेच येथे राहणारे लोक शेती करूनच जगतात. पण गावातील शेतकऱ्यांनी अशी कल्पना अंगीकारली, ज्यामुळे आज या गावाची गणना जगातील श्रीमंत गावांमध्ये झाली. या गावात राहणारा प्रत्येक माणूस पक्क्या आलिशान घरात आरामात राहतो.त्यांच्या कडे महागडे वाहन देखील आहे. गावात पक्के रस्ते आणि ड्रेनेजची योग्य व्यवस्था आहे.
 
हे गाव जेव्हा वसले तेव्हा आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. हे गाव 1961 मध्ये वसविण्यात आले. तेव्हा हे गाव खूप गरीब होते आणि इथल्या शेतीची अवस्था फार वाईट होती. मात्र त्यानंतर गावात कम्युनिस्ट पक्षाची संघटना निर्माण झाली. त्याचे अध्यक्ष वू रेनवाओ यांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. येथे प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीवर शेती करण्याऐवजी सामूहिकरीत्या शेती करू लागला. सामूहिक शेतीमुळे लोकांचे भविष्य असे बदलले आहे की आज प्रत्येकजण करोडपती आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या कलाकाराच्या कलेने जिंकले एमएस धोनीचे मन,धोनी वैयक्तिकरित्या भेटले