जपानची भूमी पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाने हादरली आहे. हा भूकंप जपानमधील आओमोरी येथील हाचिनोहेजवळ झाला. त्याची तीव्रता ६.७ मोजण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी जपानमध्ये एक अतिशय जोरदार भूकंप जाणवला. भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाची तीव्रता ६.७ रिश्टर स्केल इतकी होती, ज्यामुळे अनेक जपानी शहरांमध्ये घबराट पसरली आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची व्याप्ती अद्याप अज्ञात आहे. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त १० किलोमीटर खाली होते. गेल्या २४ तासांत जपानला बसलेला हा पाचवा भूकंप आहे. तसेच ईशान्य जपानमध्ये भूकंप झाल्यानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik