Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता कोंबड्या देणार औषधी अंडी

आता कोंबड्या देणार औषधी अंडी
सोन्याचे अंडे देणार्‍या कोंबडीनंतर आता औषधी अंडी देणार्‍या कोंबड्या येत आहेत. जपानी शास्त्रज्ञांनी कोंबड्यांच्या गुणसूत्रात काही बदल करून अशा कोंबड्या तयार केल्या आहेत.
 
या कोंबड्या औषधी अंडे देतात आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजरांशी लढण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. योमियुरी शिम्बून नावाच्या जपानी नियतकालिकात या संशोधनाचे वृत्त प्रकाशित झाले आहे. सध्याच्या उपचार व औषधांच्या तुलनेत या अंड्यांपासून बनणारी औषधे अधिक किफायती असतील, अशा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.
 
जपानच्या नॅशनल इन्सिट्टयूट ऑफ अॅडवान्स्ड इंडिस्ट्रियल सायन्स अॅड टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. त्यांनी गुणसूत्रांच्या मदतीने कोंबड्यांमध्ये इंटरफिरोन बीटा पेशी निर्माण केल्या. या पेशी चिकन स्पर्मच्या आधीच्या प्रक्रियेत असतात. त्यानंतर या पेशींचा उपयोग अंड्यांचे फलन करण्यासाठी करण्यात आला जेणेकरून अशा औषध असलेले अंडे देणार्‍या कोंबड्या निर्माण करता याव्यात. सध्या या शास्त्रज्ञांकडे असे अंडे देणार्‍या तीन कोंबड्या असून त्या दररोज औषधयुक्त अंडी देतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मला जिवे मारण्याची 12 वेळा धमकी