जपान विश्वभरात वेळ पाळण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीमुळे ही धारणा मजबूत झाली आहे. येथे जल विभागात काम करणार्या एका अधिकार्याला लंचहून केवळ 3 मिनिटे आधी डेस्क सोडल्यामुळे विभागाला प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन माफी मागावी लागली.
जपानच्या कोब येथे वॉटरवर्क्स ब्युरोत काम करणारा हा अधिकारी 12 वाजून 57 मिनिटाला आपल्या सीटवरुन उठून गेला जेव्हाकि लंच ब्रेक दुपारी 1 वाजेपासून सुरू होतो. या कर्मचार्याला लोक सेवा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले गेले. या कायद्यातंर्गत कामाच्या तासात कर्मचार्यांना आपल्या कामावर लक्ष देणे गरजेचं असतं.
असे पहिल्यांदा झाले असे नाही. हा कर्मचारी मागील 7 महिन्यात 26 वेळा वेळेपूर्वी आपली डेस्क सोडण्यासाठी दोषी ठरला. विभागाने अर्ध्या दिवसाचा पगार कापत त्याला याबद्दल बजावले देखील.
प्रेस कॉन्फ्रेस दरम्यान विभागाने म्हटले की आमचा लंच ब्रेक दुपारी 1 वाजता होत असून दोषी अधिकार्याने यापूर्वीच आपली डेस्क सोडली. या व्यवहारासाठी आम्हाला खेद आहे आणि माफी मागतो.