Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंडनमध्ये Jioप्लॅटफॉर्मला "क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड" प्रदान करण्यात आले

webdunia
लंडन/नवी दिल्ली , गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (17:24 IST)
लंडनमध्ये आयोजित वर्ल्ड कम्युनिकेशन अवॉर्ड्सच्या 24 व्या आवृत्तीत जिओ प्लॅटफॉर्मला क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. दूरसंचार क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील सर्वोत्कृष्ट कंपन्या आणि वरिष्ठ अधिकारी या पुरस्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
जिओ प्लॅटफॉर्मला त्याच्या कॉम्बो 5G/4G कोअर नेटवर्क सोल्यूशनसाठी क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड मिळाला. या पुरस्कार विजेत्या नेटवर्क सोल्यूशनच्या आधारे रिलायन्स जिओ भारतात 5G लाँच करणार आहे. Jio ने अनेक शहरांमध्ये 5G च्या युजर ट्रायल सुरु केल्या आहेत.
 
ग्राहकांच्या मागणीची पूर्तता जलद गतीने करण्यासाठी, दूरसंचार कंपन्यांना शक्य तितक्या लवकर स्केलेबल, लवचिक आणि अपडेट करण्यायोग्य उपायांची आवश्यकता आहे. यासाठी कंपन्यांना क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर चालणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. क्लाउड नेटिव्ह हा क्लाउड कॉम्प्युटिंग वातावरणात आधुनिक ऍप्लिकेशन्स तयार करणे, तैनात करणे आणि व्यवस्थापित करणे यासाठी सॉफ्टवेअर दृष्टीकोन आहे. अशा उत्कृष्ट सोल्यूशन्स तयार केल्याबद्दल जिओला 'क्लाउड नेटिव्ह अवॉर्ड' देण्यात आला आहे.

Edited by : Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टॅक्सीत बाळाचा जन्म, कॅब मालकाने 5600 रुपयांचे बिल पाठवले