अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहर बुधवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हादरले. परदेशी दूतावास असलेल्या वझीर अकबर खान भागात हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासाच्या कार्यालयापासून 50 मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. भारतीय दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय प्रतिनीधी मनप्रीत व्होरा यांनी दिली. बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर असलेले घराचे दरवाजे आणि काचा फुटल्या. नेमकी किती जिवीतहानी झाली ते लगेच समजू शकलेले नाही. वझीर अकबर खान भागातून काळया धुराचे लोट उठताना दिसत आहेत. कोणाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट करण्यात आला ते स्पष्ट झालेले नाही.