Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंधार विमान अपहरणकर्ता झहूर मिस्त्री कराचीत ठार

कंधार विमान अपहरणकर्ता झहूर मिस्त्री कराचीत ठार
, मंगळवार, 8 मार्च 2022 (21:58 IST)
1999 मध्ये IC-814 चे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक जहूर मिस्त्री उर्फ ​​जाहिद अखुंद मारला गेला आहे.
पाकिस्तानी गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, जाहिदची कराची शहरात हत्या करण्यात आली. जाहिद अखुंद या नव्या ओळखीने मिस्त्री हा गेल्या अनेक वर्षांपासून कराचीत राहत होता.अखुंद हा कराचीच्या अख्तर कॉलनीमध्ये असलेल्या क्रिसेंट फर्निचरचा मालक होता. हत्येचा कट रचला गेला असून हल्लेखोर मोटारसायकल वर आले होते. हल्लेखोरांनी आधी रेकी करून गोदामात शिरले आणि त्यांनी अखुंदवर गोळीबार केला. या मध्ये अखुंद जागीच ठार झाला.
 
भारतीय एअरलाइन्सच्या IC 814 विमानाचे नेपाळमधून 24 डिसेंबर 1999 रोजी पाच अपहरणकर्त्यांनी अपहरण केले होते. हे विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई नेण्यात आले. यानंतर शेवटचा मुक्काम म्हणून ते अफगाणिस्तानातील कंधार  येथे उतरवण्यात आले. त्या काळात अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा होता. विमानातील प्रवाशांना आठवडाभर ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर भारताने दहशतवादी मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांच्या सुटकेच्या बदल्यात ओलिसांची सुटका केली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CSK 2022 Schedule:धोनीचे चेन्नई सुपर किंग्जचे संपूर्ण वेळापत्रक,हे संभाव्य प्लेइंग-11 असू शकते