Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात स्फोट, चिनी नागरिकांसह4 जण ठार

पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात स्फोट, चिनी नागरिकांसह4 जण ठार
, मंगळवार, 26 एप्रिल 2022 (16:20 IST)
पाकिस्तानातील कराची विद्यापीठात मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये चिनी नागरिकांचाही समावेश असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात स्फोट, चिनी नागरिकांसह 4 जणांचा मृत्यू पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची शहरात असलेल्या या विद्यापीठात हा प्रकार घडणे ही मोठी घटना आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इमारतीजवळ हा स्फोट झाला. सिंध पोलीस प्रमुखांनी या घटनेला दुजोरा दिला असून मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनाही यासंदर्भात अपडेट देण्यात आल्याचे सांगितले.
 
 दुपारी 2.30 च्या सुमारास व्हॅनचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला. एका पांढऱ्या व्हॅनचा स्फोट झाला आणि त्यानंतर धूर पसरल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील फुटेजमध्ये दिसत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2022: सलग पराभवानंतर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडणार का?