कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
हेरगिरी व घातपाती कारवायांच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी अटक केली होती. ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानातून त्यांना अटक करण्यात आली होती. तर भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा देखील सुनावली होती. मात्र भारताने याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. शेवटी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.