Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 17 March 2025
webdunia

पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला,90 सैनिक ठार

पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला,90 सैनिक ठार
, रविवार, 16 मार्च 2025 (16:27 IST)
क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले, असे वृत्त आहे. तर डझनभर जखमी झाले. गेल्या आठवड्यात बलुचिस्तानमध्ये ट्रेन अपहरण करणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.
आत्मघातकी बॉम्बस्फोटात सुमारे 90सैनिक ठार झाले आहेत. बीएलएच्या माजीद ब्रिगेड आणि फतह पथकाने 8 बसेसच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात सर्व 8 बस आणि लष्कराचे जवान जळून खाक झाले. त्याच वेळी, पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की या हल्ल्यात त्यांचे फक्त 7 सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.
बीएलएने जारी केलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या 8 वाहनांचा ताफा क्वेट्टाहून कफ्तानला जात होता. वाटेत, नोशकी परिसरातील महामार्गाजवळ आत्मघाती सैनिकांनी काफिला घेरला. एवढेच नाही तर स्फोटकांनी भरलेले एक वाहन लष्कराच्या ताफ्यात घुसवण्यात आले, ज्यामुळे सर्व वाहने स्फोटात उडून गेली. यानंतर, बलुच बंडखोरांच्या फतेह पथकाच्या सैनिकांनी सैनिकांना ठार मारले.
 5 दिवसांपूर्वी 11 मार्च रोजी बलुच बंडखोरांनी एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. ती जाफर एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेन होती, जी क्वेट्टाहून पेशावरला जात होती. ही ट्रेन मंगळवार,11 मार्च रोजी सकाळी 9 वाजता क्वेट्टाहून निघाली आणि 11 शहरे ओलांडून दुपारी 1.30 वाजता पेशावरच्या सिबी रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती, परंतु दुपारी 1 वाजता बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातील मशकाफ भागात बलुच लिबरेशन आर्मीने तिचे अपहरण केले. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: मंत्रिपद मिळाले नाही तर तरी मी माझ्या तत्वांवर ठाम राहीन नितीन गडकरीं