Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्क झुकरबर्ग म्हणाला मी राजीनामा देणार नाही

मार्क झुकरबर्ग म्हणाला मी राजीनामा देणार नाही
वॉशिंग्टन , मंगळवार, 10 एप्रिल 2018 (14:03 IST)
डेटा लीकप्रकरणी आपण राजीनामा देणार नाही असे स्पष्टीकरण फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने याने दिले आहे. तसेच भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतल्या निवडणुकीत डेटा चोरी प्रकरणाच्या तपासासाठी समिती स्थापन केल्याची घोषणाही केली आहे.
 
झुकरबर्ग चालू आठवड्यात अमेरिकन काँग्रेससमोर आपली भूमिका मांडणार आहे. त्यापूर्वी सिनेटर्सची भेट घेण्यासाठी तो राजधानी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाला. यापूर्वी त्याने ‘अटलांटिक’मासिकाला विशेष मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने राजीनाम्याचे वृत्त फेटाळले.
 
“मी वेगळ्या दृष्टीकोनातून काम करतो. पण या प्रकरणी उपस्थित झालेले मुद्दे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.” असे झुकरबर्ग म्हणाला. तसेच, “फेसबुकच्या स्थापनेपासून 14 वर्षात आमच्यासमोर अनेक अडचणी आल्या. पण त्या सोडवण्याच्या दिशेने आम्ही यशस्वी काम केलं. याची सुरुवात वसतीगृहाच्या एका खोलीत झाली. पण आज त्याची व्याप्ती फार मोठी झाली आहे. तेव्हा सद्या उपस्थित प्रश्नावर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू.” असेदेखील त्याने म्हटले.  
 
दरम्यान, झुकरबर्ग आज सिनेट ज्यूडिशेअरी आणि कॉमर्स समिती संयुक्त सुनावणीत आपले म्हणणे मांडेल. तर बुधवारी काँग्रेसच्या आणखी एका समितीसमोर आपले म्हणणे मांडणार आहे. पण ब्रिटेन आणि इतर परदेशी समित्यांसमोर आपले म्हणणे मांडण्यास झुकरबर्गने नकार दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद