बंदुकीच्या धाकावर भारतीय महिलेचा पाकिस्तानातील नागरिकासोबत जबरदस्तीने विवाह करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या पीडित महिलेने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांना भारतात परतण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
उझमा असे या भारतीय महिलेला बंदुकीच्या धाकावर पाकिस्तानात पळवून नेण्यात आले. तिने इस्लामाबाद उच्च न्यायालयात पती ताहीर अलीविरोधीत खटला भरल्याने ही बाब प्रकाशझोतात आली. पती ताहिर विरुध्द धमकावणे आणि छळ करणे, असा आरोप तिने केला. तिने न्यायालयातील जबाबात स्थलांतराचे कागदपत्रे पतीने बळजबरीने घेतल्याचे सांगितले आहे, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या पीडित महिलने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांची भेट घेऊन आपबिती कथन केली. यावेळी तिने भारतात सुरक्षतिपणे पाठविले जात नाही, तोपर्यंत भारतीय उच्च आयुक्तालय सोडणार नाही असे म्हटले आहे.
दरम्यान भारतीय महिलेला पळवून पाकिस्तानात नेण्याच्या घटनेमुळे भारत-पाकिस्तानातील संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.