Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण स्फोट मध्ये 406 जखमी, अनेकांचा मृत्यू

भीषण स्फोट मध्ये 406 जखमी
, शनिवार, 26 एप्रिल 2025 (18:14 IST)
इराणच्या बंदर अब्बास शहरात भीषण स्फोट, ४०० हून अधिक लोक जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण इराणमधील बंदर अब्बास या बंदर शहरातील शाहिद राजाई बंदरात मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा धक्का अनेक किलोमीटर अंतरावर जाणवला. दूरवरच्या घरांच्या काचा फुटल्या, वस्तू इकडे तिकडे पडल्या आणि लोक घाबरून पळू लागले. या अपघातात ४०६ लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 
या स्फोटाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्वलनशील पदार्थांच्या साठवणुकीत निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाला. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, आणि जखमींना रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाकरे गटाला निमंत्रण दिल्याने मनसेवर भाजप नाराज, बैठकीला उपस्थित राहण्यास दिला नकार