अफगाणिस्तानातील काबूलमध्ये भीषण स्फोट झाला आहे. काबूलच्या मशिदीत झालेल्या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात सुमारे 40 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काबूलच्या आपत्कालीन रुग्णालयाने सांगितले की, तेथे एकूण 27 लोकांना दाखल करण्यात आले आहे. त्यात पाच मुलांचाही समावेश आहे. काबूलच्या सुरक्षा विभाग खालिद जरदान यांनी स्फोटाला दुजोरा दिला आहे.
रशियाची अधिकृत वृत्तसंस्था आरआयए नोवोस्तीने दिलेल्या माहितीनुसार, येथे अनेक लोक व्हिसासाठी उभे होते.अर्जदारांची नावे देण्यासाठी एक रशियन मुत्सद्दी बाहेर आला.त्यावेळी हा स्फोट झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोट करणारा हा आत्मघाती बॉम्बर होता.हल्ल्यानंतर तो आत जात असताना सशस्त्र रक्षकांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.