स्पेनमधील विलाफ्रांका डेल एब्रो येथील जार्डिनेस डी व्हिलाफ्रांका या निवृत्ती गृहात शुक्रवारी भीषण आग लागली. या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता ही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला किमान दोन तास लागले.
स्थानिक सरकारी प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार, अधिकारी हे पुष्टी करू शकले नाहीत की सर्व मृत्यू निवृत्ती गृहातील आहेत की नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या सेवानिवृत्ती गृहात 82 ज्येष्ठ नागरिक राहतात.
या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असून, दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या.