Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेहक बुखारी : टिक टॉक, ब्लॅकमेलिंग आणि दुहेरी हत्याकांड

mahak bukhari
, मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (10:28 IST)
जॉर्ज टूर
मेहक बुखारी टिक टॉकवरील प्रसिद्ध स्टार होती. मात्र, तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेची सध्या जगभर चर्चा आहे. फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगमधून ही गोष्ट दुहेरी हत्याकांडापर्यंत पोहोचली.
 
स्टोक ऑन ट्रेंट या ब्रिटनमधील शहरात राहणाऱ्या मेहकनं महाविद्यालयीन शिक्षण सोडलं आणि सोशल मीडियाला करिअर म्हणून निवडलं. नुसतं करिअर म्हणून नव्हे, तर तिने त्यासाठी स्वतःला अक्षरश: वाहून घेतलं.
 
सोशल मीडियाला करिअर म्हणून निवडण्याचा तिचा निर्णय योग्य ठरला होता. कारण मेहकला जवळपास एक लाख फॉलोअर्स मिळाले. तिनं देशभरातील पार्ट्या आणि उद्घाटन समारंभांमध्ये ब्रँड प्रमोशनद्वारे भरपूर पैसे कमवायला सुरुवात केली होती.
 
शिरुर: भावावर हल्ला, भावजयीची हत्या करुन पळून जाताना तरुणाचा अपघातात मृत्यू
26 एप्रिल 2023
'माझ्या IAS पतीची दगडांनी ठेचून, गोळी झाडून हत्या झाली; मारेकऱ्याला कसं सोडू शकता?'
29 एप्रिल 2023
'नवऱ्याचा खून कसा करावा' लिहिणाऱ्या लेखिकेलाच झालेली पतीच्याच हत्येप्रकरणी जन्मठेप
29 एप्रिल 2023
मेहकची आई अनसरीन सुद्धा अनेकदा तिच्या व्हीडिओमध्ये दिसत असे. आईसोबतच्या नात्याबाबत तिला अभिमान होता आणि हे ती तिच्या व्हीडिओंमधून बऱ्याचदा बोलून दाखवत असे.
 
पण जेव्हा अनसरीन 21 वर्षीय साकिब हुसैनला भेटली, त्यानंतर अशा घटना घडल्या, ज्यातून पुढे दुहेरी हत्याकांड घडलं. आणि या हत्याकांडात मेहक आणि अनसरीन या मायलेक दोषी आढळल्या. दोघींना जन्मठेपेची शिक्षा झाली.
 
या गुन्ह्याप्रकरणी मेहकला 31 वर्षे 8 महिने तुरुंगवास, तर अनसरीन 26 वर्षे आणि 9 महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
अनसरीन आणि साकिबच्या मैत्रीचं रुपांतर शत्रुत्वात झालं
2019 मध्ये अनसरीन आणि साकिब यांनी 'आझर' या व्हीडिओ अॅपद्वारे बोलण्यास सुरुवात केली.
 
दोघांनीही एकमेकांशी संपर्क क्रमांक शेअर केला आणि नंतर जवळजवळ रोजच बोलायचे. चढ-उतारांसह हे नातं तीन वर्षे चालू राहिलं.
 
लीस्टरशरचे पोलीस निरीक्षक मार्क पॅरिश यांनी सांगितलं की, साकिबने अनसरीनबद्दल आपुलकी दाखवत, स्वत:कडे आकर्षित केलं.
 
पॅरिश पुढे सांगतात, हॉटेल, रेस्टॉरंट आणि लाउंजमध्ये दोघेही अनेकदा भेटले. 2021 मध्ये त्यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अनसरीनला संबंध संपवायचे होते. याचं साकिबला दु:ख झालं.
 
या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, त्यानं अनसरीनला तिच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली, म्हणजेच त्याच्यासोबतचं नातं संपुष्टात आणू नये.
 
पण जेव्हा साकिबनं तिचा खासगी व्हीडिओ तिच्या घटस्फोटित पतीला पाठवण्याची धमकी दिली, तेव्हा प्रकरण आणखी बिघडलं.
 
त्या वर्षाच्या अखेरीस अनसरीननं आपल्या मुलीला सर्व काही सांगितलं.
 
मात्र, या ब्लॅकमेलिंगविरोधात पोलिसात तक्रार करण्याऐवजी मेहकनं हे प्रकरण स्वतःहून हाताळण्याचा निर्णय घेतला.
 
पोलीस निरीक्षक मार्क पॅरिश म्हणाले, "साकिबच्या कुटुंबाला ओळखतो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळं मी म्हणू शकतो की साकिबला थांबवलं असतं."
 
जर बुखारी कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली असती, तर असं अजिबात झालं नसतं आणि प्रकरण इथपर्यंत पोहोचलं नसतं, असंही ते सांगतात.
 
हल्ल्याचा कट आणि हत्या
आईला मदत करण्यासाठी मेहक तिचा कार मेकॅनिक मित्र रेहान कारवान याच्याकडे गेली.
 
ऑक्सफर्ड विद्यापीठातील साकिब हुसैन याला अनसरीन बुखारी यांनी भेटण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
 
अनसिीनवर त्यानं खर्च केलेले तीन हजार पौंड त्याला परत दिले जातील, असं त्याला सांगण्यात आलं. साकिब अनेकदा तिला त्या रकमेबद्दल टोमणे मारायचा.
 
रेहानने त्याचा जवळचा मित्र रईस जमाल आणि चुलत भाऊ अमीर जमाल आणि इतर मित्रांची मदत घेतली. इतर मित्रांमध्ये नताशा अख्तर, सनफ गुल मुस्तफा आणि मोहम्मद पटेल यांचा समावेश आहे.
 
11 फेब्रुवारी 2022 रोजी, हा ग्रुप लेस्टरमधील टेस्को सुपरमार्केटमध्ये पोहोचला आणि साकिबची वाट पाहत होता. साकिबवर अचानक हल्ला करण्याचा या कटाचा उद्देश होता.
 
बॅनबरी या त्याच्या मूळ गावी, साकिब लेस्टरला जाण्यासाठी कोणाकडून तरी कार घेण्याचा प्रयत्न करत होता.
 
साकिबनं काही मित्रांना विचारलं. त्यातील एक हाशिम एजाजुद्दीन यानं त्याला कारमधून तिथं नेण्याचं मान्य केलं.
 
मार्क पॅरिशच्या म्हणण्यानुसार, "काय घडतंय, याची हाशिमला काहीच कल्पना नव्हती. तो फक्त साकिबला मित्र म्हणून त्या रात्री लीसेस्टरला घेऊन जाण्यास तयार झाला. त्याला या प्रकरणाची माहिती नव्हती."
 
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "तो एकाही आरोपीला ओळखत नव्हता. त्याला काय घडतंय, याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि काही प्रमाणात कदाचित तो एकमेव व्यक्ती असावा जो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता."
 
साकिब आणि हाशिम रात्री 1:17 वाजता टेस्को कार पार्कमध्ये पोहोचले. काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना काहीतरी गडबड झाल्याचं समजलं.
 
तो पटकन तिथून निघून गेला पण आता दोन गाड्या त्याच्या मागे लागल्या होत्या. रईस एका गाडीत तर रेहान दुसऱ्या गाडीत होता.
 
साकिबने केलेला 999 वर कॉल
खटल्यादरम्यान मेहक आणि अनसरीन रेहानच्या गाडीतून प्रवास करत असल्याचे सांगण्यात आलं.
 
मार्क पॅरिशच्या म्हणण्यानुसार, "पोलिसांना फोन रेकॉर्डवरून असं आढळून आलं की मेहकनं त्यावेळी साकिबला फोन केला होता आणि तेव्हा दोघांमध्ये भांडण झालं होतं. दोघ नेमक काय बोलले हे आम्हाला माहित नाही, पण हे स्पष्ट आहे की दोघही एकमेकांविषयी बरं-वाईट बोलले."
 
या फोन कॉलच्या एका मिनिटानंतर साकिबने 999 वर कॉल केला.
 
त्यानं ऑपरेटरला सांगितले की, तो एका कारमध्ये आहे, जिचा काही लोक पाठलाग करत होते. पाठीमागून येणाऱ्या वाहनानं आपल्याला धडकून रस्त्यावर उतरायला सांगितलं.
 
हा कॉल सुमारे पाच मिनिटं सुरू होता.
 
पाठलाग करणाऱ्यांना टाळण्यासाठी साकिब आणि हाशिम यांनी दुहेरी प्रवासी वाहतूक मार्गावरून प्रवास सुरू ठेवला आणि रेड सिग्नलवर थांबले नाहीत.
 
मार्क पॅरिश यांच्या म्हणण्यानुसार, "पहिली गोष्ट ती म्हणजे की त्यांचा मार्ग ब्लॉक केला जात आहे, असं ते सांगत होते. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कार एका वाहनानं अडवली आहे जी समोरून ब्रेक मारत आहे आणि कार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. "
 
त्यांच्या म्हणण्यानुसार, साकिब त्याच्या मित्र हाशिमला सांगतो, "सेंड इट, सेंड इट". म्हणजे हाशिमला गाडी वेगानं चालवण्यास सांगितलं.
 
मार्क सांगतात की, त्यावेळी तुम्ही त्याच्या भीतीबद्दल स्पष्टपणे अंदाज लावू शकता. रेड सिग्नलवर तो न थांबता पुढे निघाला, तरीही पाठलाग सुरूच होता.
 
साकिब आणि हाशिमच्या कुटुंबीयांनी कोर्टात केलेला 999 कॉल मीडियाला प्रसारित न करण्याची विनंती केली आहे.
 
'मी मरणार आहे'
त्या कॉलचे शेवटचे क्षण खूप कठीण होते. फोन लाइनवर शांतता आहे आणि नंतर ऑपरेटरनं साकिबला विचारलं की, तू अजूनही कॉलवर आहेस का?
 
मार्क पॅरिशच्या म्हणण्यानुसार, ते आता भावनिक आणि त्रासदायक कॉलमध्ये बदललं आहे आणि आपण ऐकू शकता की ते साकिबच्या मागे आहेत. नंतर किंचाळणे आणि मग शांतता.
 
लक्षात घ्या की अपघाताच्या काही क्षण आधी साकिब हुसेननं पोलिसांना केलेल्या कॉलचं हे रेकॉर्डिंग न्यायाधीशांना दाखवण्यात आलं होतं.
 
आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, साकिब हुसैन यांनी पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला आणि सांगितलं की मास्क घातलेले लोक दोन वाहनांमध्ये आहेत आणि त्यांची कार आदळल्यानंतर रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करत होते.
 
कॉलमध्ये व्यथित झालेला, साकिब हुसेन ऑपरेटरला सांगत आहे, "ते लोक माझ्या मागे येत आहेत. त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क घातले आहेत. ते मला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत."
 
तो पुढे म्हणाला, "मी मरणार आहे. प्लीज सर, मला तुमची मदत हवी आहे. ते मागून गाडीला धडकत आहेत. खूप वेगाने. मी तुम्हाला विनवणी करतो. मी मरणारच आहे."
 
कॉल डिस्कनेक्ट होण्यापूर्वी मोठ्याने ओरडणे देखील ऐकू येते.
 
एक वसुली चालक या महामार्गावरून रात्री 1.30 च्या सुमारास जात असताना त्याला एका झाडाजवळ कार जळताना दिसली. पोलिसांना कोणीही बोलावलं नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रकसह रस्ता बंद केला.
 
सुमारे 10 मिनिटांनी पोलिस अधिकारी तिथं पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान काही वेळातच तेथे पोहोचले.
 
आग विझवल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने कारमध्ये दोन लोकांचे मृतदेह पाहिले.
 
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुसरीकडे मेहकने स्वत: ऑडी कार चालवण्यास सुरुवात केली आणि नताशा तिच्या शेजारच्या सीटवर बसली.
 
मग तो भूमिगत होण्यासाठी पुन्हा लीसेस्टरला गेले. परतताना त्यां दोघींची कार जळत्या ढिगाऱ्याजवळून गेली.
 
यानंतर काय झालं?
शहरात आल्यावर ते सोटन प्लेस परिसरात दाखल झाले. आता ते सुरक्षित ठिकाणी पोहोचले होते. त्यांचे साथीदार गाड्यांमधून उतरून रस्त्यावर चालू लागले.
 
फेब्रुवारीच्या हिवाळ्यात ते वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रात्री दोनच्या सुमारास फिरताना दिसले.
 
फुटेज घेतलेल्या पोलिसांना ते तिथं काय करत होते हे माहीत नसलं तरी ते आपली कृत्य झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं समजलं.
 
त्यानंतर काहींना पायी तर काहींना वाहनातून घरी सोडण्यात आलं. नताशा, जी कारची मालक होती, ती बर्मिंगहॅममधील तिच्या घरी परत गेली. मेहक आणि तिची आई अनसरीन स्टोक-ऑन-ट्रेंटच्या उत्तर भागात राहायला गेल्या.
 
येथे लीसेस्टरशायर पोलिसांना असं काहीतरी माहित होतं जे त्या ग्रुपला माहित नव्हतं.
 
साकिबचा 999 नंबरचा कॉल तपासकर्त्यांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांसह तपास सुरू केला.
 
त्यांनी अलर्ट जारी केला आणि वेस्ट मिडलँड्समधील दोन अधिकाऱ्यांनी नताशाच्या कारचा माग काढला.
 
त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला आणि नंतर तिला पेट्रोल पंपवर पकडलं. हे घडण्याआधी तिनं घाबरून रईसला फोन केला.
 
यानंतर त्यांना अटक करून ताब्यात घेण्यात आलं.
 
जेव्हा पोलिसांनी मेहकच्या घराचं दार ठोठावलं
रात्री आठ वाजून गेल्यावर संभाषणाच्या आवाजाने मेहक आणि असरीनला जाग आली. त्यानंतर पोलीस मेहकचा भाऊ आणि वडिलांशी बोलत होते.
 
त्यावेळी मेहकच्या लक्षात आलं की रईस तिला वारंवार फोन करत आहे, नताशाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं माहीत होतं.
 
पोलीस अधिकारी घरातील पुरुष सदस्यांशी बोलत असताना मेहकने रईसला फोन केला.
 
त्यानंतर तिनं दुसऱ्या खोलीत असलेल्या आपल्या आईला एसएमएस पाठवला. त्यात अधिकाऱ्यांना काय सांगायच ते मॅसेजमध्ये टाइप केलं होतं.
 
मेहकने पोलिसांना खोटे सांगितलं की, अपघाताच्या रात्री ती सोशल मीडिया कार्यक्रमासाठी नॉटिंगहॅमला जात होती.
 
त्यानंतर आई-मुलगी दोघांना अटक करून लेस्टरमधील पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
 
पोलीस कोठडीतही मेहक खोटे बोलली
कोठडीत असतानाही मेहकने त्या रात्री ती काय करत होती याची खोटी माहिती दिली.
 
पण जेव्हा पोलिसांनी साकिबचा 999 नंबर वाजवला तेव्हा तिला धक्काच बसला.
 
हार मानण्याऐवजी ती रडली आणि म्हणाली की साकिब खूप खोटे बोलतो आणि घटनांचा विपर्यास करतो.
 
मेहक आणि असरीन बुखारी यांच्यासह सहा जणांवर नंतर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता.
 
त्यापैकी एक मोहम्मद पटेल होता, ज्यांची नंतर सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानं पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि पाठलाग करून घडलेल्या प्रकाराची रहस्य सांगितली.
 
महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, साकिबच्या कारला धडक देण्याच्या पाठलाग दरम्यान रेहान आणि रईसचे फोनवर संभाषण झालं.
 
न्यायालयात अश्रू ढाळले
18 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, शुक्रवार 4 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी, हुसैन आणि एजाजुद्दीन या दोघांचे कुटुंबीय न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत होते.
 
न्यायाधीशांनी 28 तासांहून अधिक काळ चर्चा केली.
 
त्यादिवशी मेहक ही लीसेस्टर क्राउन कोर्टाबाहेर पत्रकारांना बघताच, त्यांच्याकडे बघून हसून हाथ हलवत अभिवादन केलं.
 
पण हा आत्मविश्वास फार काळ टिकू शकला नाही. न्यायाधीशांनी आई आणि मुलगी दोघांना दुहेरी हत्याकांडात दोषी घोषित केल्यावर ती रडली.
 
मेहक आणि अनसरीन बुखारी यांच्याशिवाय हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोन गुन्हेगारांमध्ये रेहान कारवान आणि रईस जमाल यांचा समावेश आहे.
 
सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यासाठी ज्या तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यात अमीर जमाल, नताशा अख्तर आणि सनफ गुल मुस्तफा यांचा समावेश आहे.
 
नताशा अख्तरला 11 वर्षे, अमीर जमालला 14 वर्षे आठ महिन्यांची तर सनफ गुल मुस्तफा याला 14 वर्षे आणि नऊ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
पीडित कुटुंब
या निकालानंतर, साकिबचे चुलत भाऊ आदिल बहार यांनी बीबीसीला सांगितलं की, या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं.
 
त्यांनी सांगितलं की ते त्याला रोज 'मिस' करतात. "जेव्हा आम्ही कोर्टात बसलो होतो आणि न्यायाधीश म्हणाले की ज्युरी निर्णयावर पोहोचले आहेत, तेव्हा मी अत्यंत दु: खी होतो."
 
त्याला परत आणण्यासाठी मी काहीही करेन असं ते म्हणाले.
 
हाशिमच्या स्मरणार्थ आयोजित फुटबॉल स्पर्धेदरम्यान लोकांना संबोधित करताना त्यांच्या दोन मोठ्या भावांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्ही GooglePay द्वारे पेमेंट करत असाल तर हे टॉप 5 सिक्‍योरिटी फीचरचा वापर करा