मेक्सिको-ग्वाटेमाला सीमेवर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी मोजण्यात आली आहे. अद्याप कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले.
मेक्सिकोच्या सुचियाट शहरात सकाळी सहा वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सुचियाट शहर मेक्सिको-ग्वाटेमाला सीमेवर वसलेले आहे आणि सुचियाट नदी दोन्ही देशांच्या सीमांना वेगळे करते. ज्या ठिकाणी सुचिएत नदी समुद्रात येते त्या ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र भूकंपामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मेक्सिकोमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 एवढी होती. भूकंपामुळे इमारती हादरू लागल्या, मात्र सुदैवाने मोठी हानी झाली नाही.