पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, ही वेबसाईट सध्या सुरू असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
एका वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला भारतातून करण्यात आला आहे. परंतु, ही वेबसाईट सध्या सुरू आहे. आयटी टीमने यावर नियंत्रण मिळवले आहे, असे म्हटले आहे.