Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानमध्ये डॉक्टरच्या बेपर्वाहीमुळे 400 हून अधिक HIV रुग्ण

पाकिस्तानमध्ये डॉक्टरच्या बेपर्वाहीमुळे 400 हून अधिक HIV रुग्ण
उत्तरी पाकिस्तानच्या एका गावात शेकडो लोक एचआयव्हीने पीडित झाले आहेत. याचे कारण येथील एका डॉक्टरने दूषित सिरिंज वापरले असल्याचे समोर आले आहे. या आजाराच्या जाळ्यात 
 
वयस्करच नव्हे तर लहान मुले देखील अडकले आहेत. हे प्रकरण पाकिस्तानच्या लरकाना येथील आहे.
 
मागील महिन्यात प्रशासनाला शहराच्या बाह्य भागात 18 मुले HIV पॉझिटिव्ह असल्याची सूचना मिळाली होती. नंतर तपासणीत डॉक्टरची चूक कळून आली.
 
स्वास्थ्य अधिकारी यांच्याप्रमाणे 400 हून अधिक लोकांची रिपोर्ट HIV पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे गावातील लोक आक्रोशीत तसेच घाबरलेले देखील आहेत. अधिकार्‍यांप्रमाणे ही घटना स्थानिक बालरोगचिकित्सक यांच्या लापरवाहीमुळे घडली.
 
येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे की येथे शेकडो लोकं उपचारासाठी येत आहे. त्यांच्या उपचारासाठी कर्मचारी आणि उपरकणांची कमी आहे. आपल्या मुलांना घेऊन येणारे पालक घाबरलेले आहेत. अनेक लोकांची भीती सत्य ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक वर्षाचा मुलाला देखील या रोगाने पकडले आहे. डॉक्टरवर लोकांचा राग दिसून येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरबीआयच्या नव्या नियमामुळे देशातील अर्ध्यांहून जास्त ATM बंद होणार?