Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईने 3 वर्षाच्या मुलीला अस्वला समोर फेकले, व्हिडीओ व्हायरल

आईने 3 वर्षाच्या मुलीला अस्वला समोर फेकले, व्हिडीओ व्हायरल
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (23:20 IST)
आई आणि मुलाचे नाते इतके अनमोल असते, जे शब्दात वर्णन करणे फार कठीण आहे. म्हणूनच असे म्हणतात की देव सर्वत्र उपस्थित राहू शकत नाही, म्हणून त्याने आई बनवली आहे. आई आणि मुलाचे नाते प्रत्येक नात्यातून वेगळे असते. आणि जरी आपल्या आयुष्यातील सर्व नाती आपण जन्माला आल्यानंतर सुरु होतात, पण आई-मुलाचे नाते हे एकमेव असे नाते आहे ज्याचा धागा आईच्या गर्भाशीच जोडलेला असतो. आई कुमाता नसावी असे म्हटले जाते, पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या कलियुगी मातेवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. व्हिडीओमध्ये एका आईने आपल्याच मुलाला मृत्यूच्या दिशेने ढकलले. हा व्हिडीओ पाहून लोकांना धक्काच बसला आहे. 
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ उझबेकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आईने तिच्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलीला मरण्यासाठी धोकादायक अस्वलासमोर त्यांच्या गुह्यात फेकून दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून तेथे उपस्थित इतर लोकांच्या डोळ्यात अश्रू आले पण आईच्या काळीज दुखावला नाही. सुदैवाने तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी या मुलीला अस्वलाच्या विळख्यातून वाचवले. आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही महिला तिच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन प्राणिसंग्रहालयात गेली होती, असे सांगण्यात येत आहे. ती महिला त्या मुलीला रेलिंगवर उभे राहून अस्वल दाखवत होती. पण, अचानक महिलेने त्या मुलीला अस्वलाच्या कुशीत ढकलले. मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. त्याचवेळी लोकांचा राग आईवर उमटत आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, 'जल्लाद आई आहे.' तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'या महिलेवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि मुलीला या वाईट स्त्रीपासून दूर ठेवले पाहिजे, ती काहीही करू शकते.
 
 

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात 15 वर्षांखालील मुलांचे लसीकरण कधी होणार? सरकारने लोकसभेत उत्तर दिले