Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवादी समजून मंत्र्याची हत्या

दहशतवादी समजून मंत्र्याची हत्या
मोगादिशू , शुक्रवार, 5 मे 2017 (11:24 IST)
कुख्यात अल-शाबाब व अल-कायदामुळे अराजकतेचे काहूर माजलेल्या सोमालियात सुरक्षा रक्षकांकडून बुधवारी मोठी घोडचूक झाली. देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व खासदार अब्बास अब्दुल्लाही शेख सिराजी यांना चक्क दहशतवादी समजून त्यांच्या कारवर सुरक्षा रक्षकांनी गोळ्य़ा झाडल्या. या घटनेत त्यांच्यावर मृत्यू ओढावला आहे. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेविषयी आधिक माहिती अशी की, राष्ट्रपती भवन परिसरात टेहळणी करणार्‍या जवानांनी नियमित तपासणीसाठी एक कार अडविली. कारची झाडाझडती घेत असतानाच यात काही दहशतवादी बसल्याचा संशय जवानांना आला. त्यामुळे मागेपुढे विचार न करता जवानांनी कारवर गोळ्य़ा झाडल्या. यात दुदैवाने कारमधून जात असलेल्या केंद्रीय मंत्र्याला गोळिबाराचा शिकार व्हावे लागले. देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी कुख्यात अल-शबाबचे अतिरेकी सातत्याने हिंसाचार घडवत आहेत. अनेक मंत्री व खासदारांचा यापूर्वी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संगकाराचा 19 हजारचा टप्पा पूर्ण