Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Nagaland: कारवर दरड कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू , व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल

Nagaland:  कारवर दरड कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू , व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल
, बुधवार, 5 जुलै 2023 (16:48 IST)
social media
नागालँडमधील भूस्खलनाचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. अचानक एक मोठी दरड टेकडीवरून खाली कोसळली.आणि  दोन गाड्या उद्ध्वस्त झाल्या. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दिमापूर ते कोहिमा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 29 वर जाममध्ये अनेक वाहने अडकली आहेत. यावेळी हा अपघात झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
 
अपघाताचा हा व्हिडिओ मागे उभ्या असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन गाड्यांना पूर्णपणे चिरडून एक मोठा खडक बाहेर आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 



Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे: PSI पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर