Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पेनमध्ये उघडला नॅप बार

स्पेनमध्ये उघडला नॅप बार
आपल्या मनाला ताजेतवाणे व आरोग्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने दिवसभराच्या कामातून थोडा वेळ काढून डुलकी घेणे नेहमीच चांगले समजले जाते. मात्र अनेकांवर कामाचा एवढा भार असतो की त्यासाठी वेळ काढणे त्यांना शक्य होत नाहीच, पण तासभर निवांतपणे झोप घेता येऊ शकेल अशी जागाही त्यांना कामाच्या ठिकाणी मिळत नाही. लोकांची हीच समस्या दूर करण्यासाठी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये अनोखी व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे हल्लीच एक अनोख्या प्रकाराचा पहिला नॅप बार उघडण्यात आला आहे.
 
या बारमध्ये एक हजार रूपये मोजून तासभर शांत व सुखाची झोप घेतली जाऊ शकते. सिएस्टा अँड गो नावाच्या या नॅप बारमध्ये झोपण्यासाठी बिछाना, आराम करण्यासाठी आणि लिहिण्या- वाचण्यासाठी टेबल- खुर्चींचीही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
तिथे येणार्‍या लोकांना बारकडून नाइट शर्ट, स्लीपर, हेडफोन, चार्जर, वर्तमानपत्र आदी सुविधा पु‍रविल्या जातात. हे असे स्थान आहे जिथे तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत हव्या त्या पध्दतीने आराम करू शकतात. खरे म्हणजे या आधीही असे बार सुरू करण्यात आले आहेत.
 
पॅरिसमध्ये झेन बार एन सिएस्टा, लंडनमध्ये नॅप स्टेशन, ब्रुसेल्समध्ये पॉज, न्ययॉर्कमध्ये येलो स्पा नावाने असे बार आहेत. एवढेच नाही तर टोकियोमध्येही अनेक ठिकाणी नॅप कॅफे आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

थेट कॅशियरच्या केबिनमधून 12 लाख रुपये लांबवले