Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगापुढे शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान : मोदी

जगापुढे शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान : मोदी
दावोस , बुधवार, 24 जानेवारी 2018 (11:22 IST)
दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलताना जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा मिळाली. 1997च्या तुलनेत भारताचा जीडीपीही सहापटीने वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारताने नेहमी वसुधैव कुटुंबकमवर विश्र्वास ठेवला आहे. याचा अर्थ संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, असे त्यांनी म्हटले.
 
भारताचे तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा हे 1997 मध्ये दावोसला आले होते. तेव्हा भारताचा जीडीपी हा सुमारे 4 मिलियन डॉलरच्या आसपास होता. दोन दशकानंतर तो आता सुमारे सहापट अधिक आहे. आता आपण नेटवर्क सोसायटी नाही. तर बिग डेटाच्या विश्वात वावरत आहोत. 1997 मध्ये युरो चलन नव्हते. त्यावेळी ब्रेक्झिटची चिन्हेही नव्हती. त्यावेळी खूप कमी लोकांनी ओसामा बिन लादेनचे नाव आणि हॅरी पॉटरचे नाव ऐकले होते. त्यावेळी बुद्धिबळ खेळणार्‍या खेळाडूंना कॉम्प्युटरबरोबर पराभूत होण्याचा धोका नव्हता. त्यावेळी गुगलचा शोधही लागला नव्हता. त्यावेळी जर तुम्ही अ‍ॅमेझॉनचे नाव इंटरनेटवर शोधले असते तर तुम्हाला नदी किंवा पक्षचे नाव सापडले असते. ट्विट करण्याचे का पक्षीच करत असत. 
 
दावोस त्यावेळी इतर सर्वांपेक्षाही पुढे होते आणि आजही आहे. आज आपल्याकडे डेटा खूप आहे. डेटाचा पर्वत बनत आहे. त्यावर नियंत्रणाची स्पर्धा लागली आहे. आता म्हटले जाते की, जो डेटावर नियंत्रण ठेवेल तोच जगात आपले वर्चस्व कायम राखेल. आज वेगाने बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे निर्माण होणारे आव्हान अधिक गंभीर होताना दिसत आहे.
 
यावेळी त्यांनी लोकशाहीबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही भारतीय आपल्या लोकशाही आणि विविधतेवर अभिमान बाळगतो. धार्मिक, सांस्कृतिक, विविध भाषा आणि विविध प्रकारच्या समाजासाठी लोकशाही केवळ एक राजकीय व्यवस्था नाही तर एक जीवनशैली असल्याचे ते म्हणाले. 70 वर्षांच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात एकीकृत कर व्यवस्था लागू करण्यात आली. पारदर्शकता आणि जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज यांची व्यंगचित्रातून मोंदी आणि अमित शहा यांच्यावर टीका