हिजबुल्ला चीफ हसन नसरुल्लाला गुप्त ठिकाणी दफन केल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणला भीती वाटत होती की, मोठ्या अंत्यसंस्कारातील जमावावर इस्रायल मोठा हल्ला करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, नसरुल्लाहचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळल्या नाही.
नसरुल्लाह यांचा मृत्यू जीव गुदमरून झाल्याची माहिती समोर आली असून आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दफनविधीच्या संपूर्ण कार्यक्रमाला गोपनीय ठेवण्यात आले. इस्राईल या वेळी हल्ला करू शकतो अशी भीती असल्यामुळे त्यांच्या मृतदेहाला गुप्त ठिकाणी दफन करण्यात आले आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी शुक्रवारी तेहरानच्या भव्य मशिदीत नमाज अदा केली. यावेळी त्यांनी जगभरातील मुस्लिमांना एकजूट होऊन कुराणचे पालन करण्याचे आवाहन केले. मुस्लिमांनी अल्लाहने दाखविलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास ते यशस्वी होतील, असे खामेनी म्हणाले.