ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग नंतर आता नेपाळ ने देखील एव्हरेस्ट आणि एमडीएचच्या मसाल्यांवर बंदी घातली आहे. या मसाल्यांच्या काही उत्पादनांमध्ये कीटनाशक, इथिलिन ऑक्साईड असण्याची शक्यता असल्याने नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
नेपाळच्या अन्न आणि तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने या दोन कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये संशयास्पद रसायने आणि इथिलीन ऑक्साईडची तपासणी सुरू केली आहे.
नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी माहिती दिली आहे की एमडीएच आणि एव्हरेस्ट कंपनीच्या मसाल्यांच्या नेपाळमध्ये आयात करण्यास 7 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.इथिलीन ऑक्साईड निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असेल तर कर्करोगाचा धोका वाढतो.
काही काळापूर्वी हॉंगकॉंगच्या फूड रेग्युलेटर सेंटर फॉर फूड सेफ्टी ने एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाल्यांच्या उत्पादनांवर बंदी घातली होती.