Publish Date: Sat, 15 Dec 2018 (09:29 IST)
Updated Date: Sat, 15 Dec 2018 (09:43 IST)
नेपाळमध्ये आता भारतीय चलनातल्या 200, 500 व 2000 रुपयांच्या नोटा चालणार नसल्याची घोषणा नेपाळ सरकारने केली आहे. आता भारतीय चलनातील 100 रुपयांपर्यंतचीच नोट नेपाळमध्ये चालणार आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने भारतीय चलनातील 200, 500 व 2000 रुपयांच्या नोटांचा वापर व्यवहारात न करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. नेपाळ सरकारचे प्रवक्ते गोकुल प्रसाद बास्कोटा यांनी याबाबतची माहिती गुरुवारी दिली. दरम्यान भारत सरकारच्या आग्रहास्तव नेपाळने हे निर्बंध लावले असल्याचे सांगण्यात येत आहे.
webdunia
Publish Date: Sat, 15 Dec 2018 (09:29 IST)
Updated Date: Sat, 15 Dec 2018 (09:43 IST)