Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्स बंद

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्स बंद
, शुक्रवार, 10 जुलै 2020 (10:32 IST)
नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनल्स बंद करण्यात आली आहेत. नेपाळ सरकारने ही बंदी घातल्याचं बोललं जातं आहे. मात्र ही चॅनल्स नेपाळमधल्या केबल प्रोव्हायडर्सनी बंद केली आहेत. यासाठी नेपाळ सरकारने काही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही. सध्याच्या घडीला दूरदर्शन सोडून एकही भारतीय न्यूज चॅनल नेपाळमध्ये दिसत नाही.  
 
नेपाळमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळचे माजी उपपंतप्रधान आणि सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ म्हणाले की, नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्या विरोधात भारतीय माध्यमं विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. भारतीय माध्यमांनी अशा प्रकारे वृत्तं देणं बंद करावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या काही निर्णयांमुळे देशाच्या संसदेपासून अगदी नेपाळमधल्या रस्त्यांपर्यंत त्यांना विरोध दर्शवला जातो आहे. मात्र भारतीय न्यूज चॅनल्स आपल्या मर्यादा सोडून वृत्तांकन करत आहेत असंही काही नेते म्हणाले असल्याचं समजतंय. दरम्यान सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही मात्र आम्ही भारतीय न्यूज चॅनल्स दाखवणं बंद करतो आहोत असं नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सॅमसंगच्या स्मार्टफोनसोबत चार्जर मिळणार नाही