Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूझीलंडमध्ये कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन

न्यूझीलंडमध्ये कोरोनामुळे पुन्हा लॉकडाऊन
, मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (08:28 IST)
कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने ऑकलंडमध्ये २६ ऑगस्टपर्यंत अलर्ट ३ लॉकडाऊन आणि इतर ठिकाणी अलर्ट २ लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच देशातील सर्वसाधारण निवडणुका चार आठवडे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 
 
न्यूझीलंडने जूनमध्ये देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर १०२  दिवसांनी या देशात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले. सध्या न्युझीलंड  ॲक्टिव्ह रूग्णसंख्या६९ वर पोहचली आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून न्यूझीलंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. 
 
न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत १६३१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामधील १५३१ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.७८ रुग्ण उपचार घेत असून,२२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Infinix Smart 5 ला जागतिक स्तरावर प्रक्षेपित केले गेले, जाणून घेऊ या कॅमेरा, किंमत आणि वैशिष्ट्ये