Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूजीलंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा

न्यूजीलंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा
वेलिंग्टन , मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (13:31 IST)
आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. या पदावरुन स्वतःची मुक्तता करुन घेताना त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता असे त्यांनी म्हटले. यापुढे आपण काय करणार हे आपल्याला माहित नसल्याचीही कबुली त्यांनी यावेळी दिली. पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यासोबतच त्यांनी न्यूझीलंड राष्ट्रीय पक्षाच्या नेते पदाचाही राजीनामा दिला. न्यूझीलंडच्या महान नेत्यांपैकी एक म्हणून की यांची गणना होते. देशाच्या चांगल्या आणि वाईट काळात की यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली आपल्या देशाने प्रगती साधली. त्यांच्या काळात आपल्या देशाने आत्मविश्वास कमवून एक यशस्वी राष्ट्र म्हणून ओळख स्थापित केली असे गौरवोद्गार त्यांच्याबाबत न्यूझीलंडचे उप-पंतप्रधान बिल इंग्लिश यांनी काढले. जेव्हा की यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा संपूर्ण देशाला धक्का बसला. त्यांच्या खासदारांना देखील ही घोषणा अनपेक्षितच होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा राजीनामा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरुन दिला आहे. की दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या आयुष्यात की यांचा हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढला होता. त्यामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन कुटुंबावरच लक्ष केंद्रित करा असा सल्ला त्यांची पत्नी ब्रोनाघ यांनी त्यांना दिला असे सूत्रांनी सांगितले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झहीरची नवी मैत्रीण सागरिका घाटगे!