नायजेरियामधील बोको हराम या दहशतवादी संघटनेविरुद्ध मोहीम राबवत असताना हवाई दलाने चुकून निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नायजेरियन सैन्याने चौकशीचे आदेश दिले आहेत.
या हल्ल्यात रेड क्रॉस या संघटनेच्या २० कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. युद्धग्रस्त नायजेरियामध्ये रेड क्रॉ़सतर्फे मदत केली जाते. या घटनेमध्ये आत्तापर्यंत १२० हून अधिक जण जखमी झाले आहे. नायजेरियन सैन्याने पहिल्यांदाच चुकून हवाई हल्ला केल्याची कबूली दिली आहे.