अमेरिकेतील जेफ्री सी हॉल, मायकल रॉसबॅश आणि मायकल यंग या तीन वैज्ञानिकांची वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मानवाच्या अंतर्गत जीववैज्ञानिक चक्रासंबंधी (इंटरनल बायलॉजिकल क्लॉक) या तीन शास्त्रज्ञांनी महत्वाचं संशोधन केलं असल्यानं त्यांची नोबेलसाठी निवड करण्यात आली आहे.
इंटरनल बायलॉजिकल क्लॉकला सर्केडियन रिदम या नावानंही ओळखलं जातं. ग्रह ज्याप्रमाणे दुसऱ्या ग्रहाभोवती परिक्रमा पूर्ण करतं त्याप्रमाणे सजीवांचं देखील चक्र सुरु असतं. यालाच इंटरनल बायलॉजिकल क्लॉक असं म्हणतात. या क्रियेमुळेच जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरण आणि झोप ही प्रकिया सुरु असते. नोबेल समितीनं याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की, ‘हॉल, रॉसबॅश आणि यंग यांनी बायलॉजिकल क्लॉक आणि त्याची अंतर्गत कार्यप्रणाली याबाबत अगदी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.’