उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या कारवायांना आवर घालत नाही. किम जोंगने पुन्हा एकदा अज्ञात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर जपान आणि दक्षिण कोरिया या शेजारी देशांनी खळबळ उडवून दिली आहे. उत्तर कोरियाच्या या कृतीवर दोन्ही देशांच्या सरकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे आणि जनतेला त्वरित माहिती प्रदान करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. किशिदा यांनी अधिकाऱ्यांना विमान, जहाजे आणि इतर मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जतेसह सर्व संभाव्य खबरदारीचे उपाय करण्यास सांगितले आहे.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या सैन्याने यापूर्वी संयुक्त लष्करी सराव केला होता. याचा निषेध म्हणून, उत्तर कोरियाने गेल्या आठवड्यात डझनभर क्षेपणास्त्रे डागली आणि युद्धविमानाचा सराव केला. यानंतर दि. कोरिया आणि जपानने त्यांच्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. दोन्ही देशांच्या वतीने त्यांच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगण्यात आले.