Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक भाषणासाठी ओबामा घेतात 4 लाख डॉलर

एक भाषणासाठी ओबामा घेतात 4 लाख डॉलर
वॉशिंगटन: युवा वर्गात आपल्या भाषणांमुळे सर्वांनाच भुरळ घालणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे चांगलेच प्रसिद्ध असून त्यांना आजही भाषणासाठी बोलवण्यासाठी पहिली पसंती असते. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एका भाषणासाठी ओबामा यांचे मानधन किती असावे? पण जर तुम्ही त्यांच्या मानधनाचा आकडा ऐकाल तर तुम्हाला चांगलाच घाम फुटेल.
 
तब्बल दोन कोटींपेक्षाही अधिक रुपये एका भाषणाचे ओबामा घेतात. त्यांनी अमेरिकेतील वॉल स्ट्रिटवर काही दिवसांपूर्वी सार्वजनिक भाषण दिले होते. तेव्हा त्यांनी त्या भाषणासाठी ४ लाख अमरिकी डॉलर घेतले होते. ओबामाने त्यांच्या या संभाषण कलेचा उपयोग उत्पन्न कमावण्यासाठी केल्याने त्यांच्यावर टीका देखील झाली. मात्र याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
 
आणखी एका कार्यक्रमात गुरुवारी ओबामांनी भाषण दिले. त्यांनी ऍडवर्टाइजिंगच्या या कार्यक्रमासाठी इतकेच पैसे घेतले. या पैशामध्ये त्यांचा ९० मिनिटांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. या एका इंटरव्ह्यूसाठी त्यांना दोन कोटी पेक्षा अधिक रुपये द्यावे लागले. गुरुवारी झालेले भाषण लोकांना विशेष आवडले. या भाषणात अनेकदा त्यांनी टाळ्या घेतल्या. हा कार्यक्रम हिस्ट्री चॅनलनं आयोजित केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्पेस डिप्लोमसी: शेजार्‍यांसाठी भारताचा उपग्रह!