Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका चॉकलेट ने लखपती बनवले

एका चॉकलेट ने लखपती बनवले
, बुधवार, 15 डिसेंबर 2021 (16:28 IST)
चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही. विशेषत: मुलांना चॉकलेट खायला खूप आवडते. पण चॉकलेट कुणाचे नशीब फिरवू शकते असे कुठे होते? यावेळी खरोखरच हे घडले. एका आईने चॉकलेट खरेदी केले आणि या चॉकलेटने तिला लखपती बनवले. प्रत्यक्षात असे घडले की ही योजना एका सुपर मार्केटमध्ये सुरू होती. या योजनेंतर्गत चॉकलेट घेण्यासाठी गोल्डन तिकीट दिले जात होते. या तिकिटातून कुणाचे नशीब चमकणार होते. इंग्लंडमधील रहिवासी असलेल्या सियान वॉकरने आपल्या मुलासोबत हे चॉकलेट खरेदी केले. आणि या तिकिटामुळे त्यांचे आयुष्य बदलले.
आई-मुलांनी मिळून ते अल्दी स्टोअरमधून डेअरीफाईन गोल्डन गिव्हवे चॉकलेट बारमधून विकत घेतले. यातूनच त्यांना गोल्डन तिकीटही मिळाले. त्याची किंमत 5000 युरो ते 10,000 युरो पर्यंत असू शकते. 43 वर्षीय सियान सांगतात की, जेव्हा तिला समजले की तिने या तिकिटातून मोठी रक्कम जिंकली आहे, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती म्हणते की आधी तिने चॉकलेटचे एक लहान पॅकेट उचलले, नंतर तिने आपल्या मुलासोबत शेअर करण्यासाठी एक मोठे पॅकेट उचलले. यामुळे त्याचे नशीब खुलले.
आता या रकमेतून सियानला तिचे घर बनवायचे आहे. या घटनेबाबत ती म्हणते, 'मी सुरुवातीला माझ्या मुलासोबत मस्करी करत होते, आम्ही ते उघडले तेव्हा आतमध्ये सोन्याचे तिकीट होते.' अशातच चॉकलेट खरेदी केल्याने त्यांचे नशीब पालटले. आणखी एका माहितीनुसार, गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये अशा  25 गोल्डन तिकीटामुळे अनेकांनी लाखोंची बक्षिसे जिंकली आहेत. त्यामुळे ही बातमी खूप शेअर केली जात आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा