Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pakistan: कराचीमध्ये गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी, 12 ठार

pakistan
, शनिवार, 1 एप्रिल 2023 (10:26 IST)
पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीच दयनीय होती की आता लोकांना गव्हाच्या पीठासाठी जीव गमवावा लागतो. पाकिस्तानच्या बंदर शहर कराचीमध्ये शुक्रवारी रमजान अन्न वितरण केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह किमान 12 लोक ठार झाले. एवढेच नाही तर इतरही अनेक जण जखमी झाले आहेत. फुकट पीठ घेण्यासाठी लोक आले होते.
 
जीवनाश्यक वस्तू वाटल्या जात होत्या. वास्तविक, पाकिस्तानमध्ये महागाईमुळे पिठाची किंमत 160 रुपये किलोवर पोहोचली आहे, त्यामुळे सरकार या केंद्रांद्वारे स्वस्त आणि मोफत पीठ उपलब्ध करून देत आहे. मृतांमध्ये आठ महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर 29 जण गंभीर जखमी आहेत. पोलीसही घटनास्थळी हजर होते, मात्र चेंगराचेंगरी होताच जवान पळून गेले. पंजाब प्रांतात गेल्या आठवडाभरात सरकारकडून मोफत वाटले जाणारे गव्हाच्या पीठ गोळा करण्यासाठी चेंगराचेंगरीच्या काही घटना घडल्या आहेत. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2023:ओपनिंग सेरेमनीमध्ये सुरांचा बादशाह अर्जित सिंग धोनीसमोर नतमस्तक फोटो व्हायरल !