Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक कोटीचा पिझ्झा!

एक कोटीचा पिझ्झा!
न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीला पिझ्झामुळे चांगलाच धडा मिळाला आहे. एक दिवस संध्याकाळी त्याने पिझ्झा ऑर्डर केला. पिझ्झा आल्यावर त्याने ‍क्रेडिट कार्डद्वारे त्याचे बिल भरले. दुसर्‍या दिवशी तो सामान खरेदी करायला बाजरात गेला. खरेदी झाल्यावर बिल देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड पुढे केले. त्याच्या कार्डवर काहीच पैसे शिल्लक नसल्याचे लक्षात येताच मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
 
त्याच्या अकाउंटमधील जवळपास एक कोटी रूपये काढले गेले होते. त्याने लगेच बँकेशी संपर्क साधला व याबाबत तक्रार नोंदवली. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, आदल्या दिवशी मागवलेल्या पिझ्झाचे 18 डॉलर्सइतके बिल चुकून एक लाख 80  हजार डॉलर्सइतके दिले गेले आणि त्याचे अकाउंट रिकामे झाले. अर्थात, याबाबत तक्रार केल्यानंतर दोन दिवसांत त्याच्या खात्यात पैसे पुन्हा जमा झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मुंबई- पुणे एक्सप्रेस- वे'वर मिळणार 'वाय-फाय'ची सुविधा