चीनच्या गुआंग्शी भागात सोमवारी 133 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले. चीनच्या अधिकृत मीडिया सीसीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बोईंग 737 विमानात 130 हून अधिक लोक होते आणि ते गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराच्या बाहेरील भागात कोसळले, असे अहवालात म्हटले आहे. या अपघातामुळे डोंगराला आग लागल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात अनेकांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे .सध्या प्रशासनाने घटनास्थळी बचाव पथके पाठवली आहेत. मदतकार्य वेगाने सुरू आहे, मात्र अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विमान अपघाताचे कारण जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स परत मिळवणे आवश्यक असून, त्याचा वेगाने शोध सुरू आहे.