Plane crashes in Canada कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील चिलीवॅक येथील विमानतळाजवळ शुक्रवारी एक छोटे विमान कोसळून तीन जण ठार झाले. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली आहे. कॅनडात विमान अपघातात 2 भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचाही मृत्यू झाला. दोघेही मुंबईचे रहिवासी होते.
रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता (2100 GMT) पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान विमानतळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मोटेलजवळ खाली पडले.
या अपघातात पायलटसह विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, कॅनडाच्या ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासकर्त्यांची नियुक्ती केली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांची नावे जाहीर केलेली नाहीत.