Publish Date: Fri, 16 Dec 2016 (11:54 IST)
Updated Date: Fri, 16 Dec 2016 (11:56 IST)
एका पस्तीस वर्षीय ब्रिटीश महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय नागरिकाला तीन महिन्याची कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'एका तेवीस वर्षाच्या मुलाने पस्तीस वर्षीय महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पती घरी आल्यनंतर तक्रार दाखल केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने भारतीयाला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.' एक व्यक्ती पाकिट घेऊन माझ्या घरी आला होता. घराच्या आवारात असताना पाकिट घेऊन त्याला पैसे दिले. त्यावेळ त्याने माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडे तक्रार करेल असे म्हटल्यानंतर त्याने मला सोडून पळ काढला. पती घरी आल्यानंतर त्याने मला सोडून पळ काढला. पती आल्यानंतर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती,' असे पीडीत महिलेने सांगितले.